water scarcity sakal media
मुंबई

कर्जत शहराला पाणीटंचाईची झळ; हंडा मोर्चा काढण्याचा महिलांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : कर्जत शहरातील भिसेगाव गुंडगे परिसर, तसेच नवीन आणि जुने एसटी स्टॅन्ड आणि विश्व नगर परिसरात नगरपालिकेकडून (Karjat Municipal corporation) पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यासाठी येथील नागरिकांना अखेर टँकरने विकत पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. कर्जत पश्चिमेला मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले (society) उभी राहिली आहेत. साहजिकच या भागातील लोकसंख्या वाढून पाण्याची मागणी वाढली. खरे तर नगरपालिकेने या संकुलांना परवानगी देताना मूलभूत सुविधांमध्ये (Basic Facilities) पुरेसा पाणीपुरवठा कशा प्रकारे करता येईल, याचे नियोजन करणे अपेक्षित होते.

मात्र, त्या दृष्टीने फारसा विचारच केला गेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. २००६ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पेज नदीवर आधारित कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी योजना राबविण्यात आली. योजना पूर्ण झाल्यावर नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, योजनेतील जलवाहिनीत तांत्रिक दोष, तसेच ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी नगरपालिकेकडे तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नसल्याने शहरातील काही भागांना अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही.

काही वर्षांत नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन करणे गरजेचे आहे. भिसेगाव-गुंडगे परिसरात तर पाण्याची कमतरता अधिक जाणवते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे, तर काही पूर्णही झाले आहेत. या गृहप्रकल्पांकडून कराच्या माध्यमातून नगरपालिका लाखो रुपये घेते. तरीसुद्धा तेथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही नगरपालिकेकडून उत्तर दिले जात नाही. पाण्याची गरज भागवण्यासाठी वर्गणीच्या माध्यमातून टँकर मागवावा लागत आहे. असे अजून किती दिवस चालणार, असा प्रश्न ऐश्वर्या खातू या महिलेने उपस्थित केला आहे .

विजेच्या पंपामुळे कमी पाणी

कमी दाबाने पाणी येत असल्याने एक हंडा भरायला अर्धा तास लागतो. त्यातच आपल्याला जास्त पाणी मिळावे, यासाठी अनेक नळजोडणीधारक विजेचे पंप जोडतात. त्यामुळे अन्य लोकांना त्यांनी पंप बंद केल्यावरच पाणी मिळते.

पाणीटंचाई हा गंभीर प्रश्‍न आहे. हा प्रश्न त्वरित सोडवला गेला नाही, तर महिलांना हंडा घेऊन नगरपालिकेवर मोर्चा काढावा लागेल.
- मयुरा जोगळेकर, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT