hospital  sakal media
मुंबई

अलिबाग : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यतत्परतेमुळे महिलचे प्राण वाचले

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसाची लगबग सुरू असतानाच आपली प्रशासकीय जबाबदारी सांभाळत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने (Dr suhas Mane) यांनी एका रुग्णावर गुरुवारी (successful surgery) यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण महिलेचे नाव (Patient sumitra patil) सुमित्रा पाटील असे आहे. सर्वच शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही (civil hospital) आर्थिक बाबींविषयी कामकाजाची धावपळ सुरू होती.

याच दिवशी अपंगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येत होते. अशा वेळेला पेण तालुक्यातील रावे गावातील सुमित्रा पाटील ही ५० वर्षीय महिला पोटदुखीच्या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिची गंभीर परिस्थिती पाहून बाह्यरुग्ण विभागातील डॉ. परजणे यांनी त्यांना तातडीने तपासले. त्यावेळी या महिलेला ‘अक्युट अपेंडीसायटीस’चा त्रास असल्याचे निदान झाले.

त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉ. परजणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना सांगितले. सायंकाळी ७.३० वाजता यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांना होणारा त्रासदेखील कमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT