Court sakal media
मुंबई

अलिबाग : चोरीप्रकरणी महिलेला एक वर्ष सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : चोरीप्रकरणी लक्ष्मी जाधव या महिलेला (Robbery crime) अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सुनैना पिंगळे यांनी एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अलिबागमधील (Alibag) चेंढरे येथील जतिन कराणी यांच्या घरी आरोपी लक्ष्मी जाधव (Culprit Laxmi Jadhav) ही महिला दहा वर्षांपासून घरकाम करीत होती. २ ऑक्टोबर २०२१ या दिवशी तिने कपाटातून २५ हजार रुपये चोरले.

या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात साक्षीदार म्हणून फिर्यादी जतिन कराणी, पंच सुधाकर घरत, प्रतित्रा पवार, तपासीक अंमलदार उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांना तपासण्यात आले.

सरकारी अभियोक्ता म्हणून कविता परीट यांनी काम पाहिले. न्यायालयात केलेला यक्तिवाद, साक्षीदार, पंच, तपास पथकाकडील पुराव्यानुसार लक्ष्मी जाधव या महिलेस दोषी ठरवत न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT