Raigad Zilha Parishad
Raigad Zilha Parishad sakal media
मुंबई

रायगड : पूर, दरडींचा धोका टाळण्यासाठी उभारणार बांबूची बेटे

प्रमोद जाधव

अलिबाग : वाढते नागरीकरण, वृक्षतोड, उत्खनन अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात (Raigad) पूरग्रस्त आणि दरडप्रवण गावांमध्ये (Flood affected villages) सातत्याने वाढ होत आहे. हा धोका टाळणे आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने (Raigad Zilla Parishad) पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत हद्दीत बांबूची बेटे उभारण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट देण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्याला दोन वर्षांत चक्री वादळासह तौत्के वादळाने झोडपून काढले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे २२ आणि २३ जुलैला दरड कोसळली. या दरडीमुळे तळीये गावांसह परिसरातील वाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुर्घटनांत ८७ जणांचा मृत्यू झाला. ६६ घरांचे पूर्णतः नुकसान झाले. अलिबाग, कर्जत, पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना या पुराचा फटका बसला. जिल्ह्यातील अनेक गावांमधील डोंगर भागातील वाढत्या वृक्षतोडीमुळे मुसळधार पावसात माती ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढत आहे. मातीची धूप होत असल्याने दरड कोसळण्याबरोबरच पुराची परिस्थिती भयावह होऊ लागली आहे.

पुराबरोबरच दरडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात बांबूची बेटे लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला बांबूची लागवड करण्याची सूचना करण्यात आली. विशेषत: ज्या भागात दरड कोसळते, त्या भागात अधिक लागवड करण्यावर भर देण्याबाबत सांगण्यात आले. बांबूच्या झाडांची लागवड केल्यास मातीची होणारी धूप रोखता येणार आहे. ही लागवड रोजगार हमी योजनेतून करण्याबाबत सांगण्यात आले आहे. या लागवडीमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून तयार होणाऱ्या बांबूंपासून उत्पन्नाचे साधन ग्रामपंचायतीला मिळणार आहे.

दरडग्रस्त गावांमध्ये जनजागृती

रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त गावे १०८ असून या गावांना सतत पडत असलेल्या पावसामुळे दरडीचा धोका असतो. धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये तलाठी, पोलिस पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शिबिर घेऊन दरड कोसळण्याची शक्यता असल्यास त्याबाबत घ्यावयाची काळजी, याची माहिती दिली जाते. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर तेथील गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वारंवार तालुका, गाव पातळीवर देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.

दरड कोसळण्याची कारणे

कमी वेळेत ५०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते. दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम करू नये. डोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्यास कमकुवत भूपृष्टावर झाडांचे कमी झालेले प्रमाण ही प्रमुख कारणे आहेत.

ग्रामीण भागातील पूर, दरडीचा धोका टाळण्यासाठी बांबूची लागवड करण्यावर भर दिला आहे. बांबू माती घट्ट पकडून ठेवतो. यातून पाण्याचे देखील संवर्धन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात बांबू लागवड करण्यासाठी नियोजन केले आहे. तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. महाड याठिकाणी आतापर्यंत ४५ हजार बांबूंची लागवडदेखील केली आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

रायगड जिल्ह्यावर दृष्टिक्षेप

ग्रामीण भागाची लोकसंख्या - १६, ६४,०५
गावांची संख्या -१,८००
ग्रामपंचायत संख्या - ८१०
दरडग्रस्त गावे - १६९
पुरग्रस्त गावे ४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT