मुंबई

डायलेसिस सेंटरमध्ये तंत्रज्ञांचा तुटवडा

CD

अलिबाग, ता. २४ (बातमीदार) : मूत्रपिंडाच्या व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह, माणगाव आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू आहेत. मात्र, या ठिकाणी १२ तंत्रज्ञांची आवश्‍यकता असताना अवघ्या सहा जणांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा परिणाम रुग्ण उपचारावर होत आहे.

रायगड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी डायलिसिसची सुविधा नव्हती. त्यावेळी अनेकांना मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील रुग्णालयांत उपचार घ्यावे लागत होते. यामध्ये अधिक वेळ आणि पैसाही खर्च करावा लागत होता.

२००९ मध्ये यावर उपाय म्हणून अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस यंत्रे देण्यात आली; परंतु पाच वर्षांपासून मूत्रपिंड व्याधींच्या रुग्णांत मोठी वाढ होत असल्याने यंत्रांची मागणी वाढू लागली. अशा परिस्थितीत सरकारी योजनांसह वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून रुग्णालयांना डायलिसिस यंत्रे देण्यात आली. अलिबाग जिल्हा रुग्णालयात सध्या ११ डायलिसिस यंत्रे असून पनवेल येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच आणि माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन अशी १८ यंत्रे आहेत. त्यांच्यासाठी १२ तंत्रज्ञांची आवश्‍यकता आहे. अवघ्या सहा तंत्रज्ञांच्या खांद्यावर हे काम आहे. या तंत्रज्ञांना यंत्रे स्वच्छ करणे आणि अन्य वैद्यकीय कामे करावी लागतात. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
.....
जिल्हा रुग्णालयातील दोन डायलिसिस यंत्रे बंद
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र डायलिसिस केंद्र आहे. या ठिकाणी ११ यंत्रे आहेत. त्यापैकी दोन बंद आहेत. गेल्या दीड महिन्यापासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
...
डायलिसिस सेंटरमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभाव
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या डायलिसिस सेंटरमध्ये पूर्वी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी होता; परंतु गेल्या तीन वर्षांपासून हा अधिकारी नाही. मुंबई येथील एक डॉक्टर दर गुरुवारी येतो. उर्वरित सहा दिवस कार्यरत परिचारिकांच्या भरवशावर केंद्राचे कामकाज चालते. पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डायलिसिससाठी आलेल्या रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

SCROLL FOR NEXT