मुंबई

२८१७ रिक्षा चालकांवर एका दिवसात कारवाई

CD
नियम मोडणाऱ्या २८१७ रिक्षाचालकांवर कारवाई नवी मुंबई वाहतुक विभागाची विशेष मोहीम नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने २० डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंर्गत पोलिसांनी सोमवारी एका दिवसात तब्बल २८१७ रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली. त्यामुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही रिक्षाचालक मनमानी करीत असून वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याच्या तक्रारी वाहतूक विभागाकडे आल्‍या आहेत. त्‍यांची दखल घेत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत १६ वाहतूक शाखांच्या वतीने रिक्षा युनियन, रिक्षा चालक-मालक यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काही रिक्षाचालक नियमांचे पालन न करता, बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे आढळल्‍याने वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांच्या १६ शाखांनी आपापल्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २८१७ रिक्षांवर कारवाई केली. यापुढेही बेजबाबदारपणे रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा चालक-मालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT