मुंबई

जलवाहिनी दुरुस्ती करता पाणी पुरवठा खंडित

CD
जलवाहिनीच्या दुरुस्‍तीमुळे कळंबोलीत पाणीटंचाई चार दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्‍याने नागरिक हैराण पनवेल, ता. २२ (प्रतिनिधी) ः कळंबोलीतील नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्‍यासाठी सिडकोकडून पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्‍याने वसाहतीतील काही भागात चार दिवसांपासून पाणी नाही. बुधवारी संतापलेल्‍या रहिवाशांनी सिडको कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला. पनवेल महापालिकेतील कळंबोली, प्रभाग ८ मध्ये बैठ्या घरांचा गृहप्रकल्प आहे. सिडकोने विकसित केलेल्या या प्रकल्पातील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोने टाकलेल्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्‍या बदलण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. यासाठी काही भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने गृहप्रकल्पातील चाळ क्रमांक सी व क्यूमधील जवळपास ८० घरातील रहिवाशांना चार दिवसापासून पाणी मिळत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. प्रतिक्रिया नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. या बाबत पूर्ण माहिती घेऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. - प्रफुल्‍ल देवरे, अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, सिडको नवीन वाहिन्या टाकत असताना तात्पुरत्या स्वरूपात जुन्या वाहिनीतून पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने चार दिवसापासून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. - उद्धव गंभीरे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: वाचा देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT