मुंबई

........आणि वैष्णवी महंत कार्यक्रम सोडून परतल्या

CD
..आणि वैष्णवी महंत कार्यक्रम सोडून परतल्या शक्तिमान ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात असलेली मालिका आहे. या मालिकेत आपण मुकेश खन्ना यांना शक्तिमानच्या भूमिकेत पाहिलं आहे. या मालिकेत मुकेश यांच्यासोबत वैष्णवी महंत या गीता विश्वासच्या भूमिकेत दिसल्या. वैष्णवी या त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात; परंतु नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे त्यांनी थेट कार्यक्रमातूनच काढता पाय घेतला. अभिनय क्षेत्रात जर तुम्ही अनेक वर्षे काम केलं आहे आणि तरी लोक तुम्हाला नावाने ओळखत नाही, तर याहून अपमान कोणताच नसतो. असेच काही तरी वैष्णवी यांच्यासोबत झाले. याविषयी स्वत: वैष्णवी यांनी सांगितलं आहे. वैष्णवी महंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या अपमानाविषयी सांगितले आहे. मुंबईत झालेल्या एका अवॉर्ड कार्यक्रमात वैष्णवी यांना बोलावण्यात आले होते. फक्त छोट्या पडद्यावर नाही, तर अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या वैष्णवी यांना या अवॉर्ड शोमध्ये चुकीच्या नावाने बोलावण्यात आले. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. या व्हिडीओत त्या म्हणाल्या, ‘मी वेळेत पोहोचले. स्टेजवर जेव्हा मला अवॉर्ड देण्याची वेळ आली तेव्हा सृष्टी माहेश्वरी सोबत माझं नाव घेण्यात आलं होतं; पण ते माझ्या जागेवर वंदना श्रीवास्तव हे नाव घेत होते. मला वाटलं कोणी वंदना असेल. पण हे एक-दोनदा नाही तर तीन-चार वेळा झालं, पण कोणी वंदना स्टेजवर पोहोचली नाही. ते वंदना हे नाव घेत माझ्याकडे बघत होते. त्यानंतर बरेच सेलिब्रिटी पुढे आले आणि त्यांनी माझं नाव घेतलं वैष्णवी; तरीदेखील ते लोक वंदना हेच नाव बोलत होते. हे माझ्यासाठी अपमानास्पद होतं.’ आणि त्या या कार्यक्रमातून परत आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT