मुंबई

१७०० डॉक्टरांवर अन्याय

CD
कोविड सेवा बजावूनही निवासी डॉक्टरांना पैसे नाहीत सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २५ : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सेवा दिलेल्या १७०० तृतीय वर्षातील डाॅक्टर विद्यार्थ्यांनाही ऋणनिर्देश म्हणून शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बाँडेड सीनिअर रेसिडेंट डाॅक्टर संघटनेने केली आहे. कोविड कर्तव्यावर रुजू असणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे; मात्र या शासन निर्णयातून २०१८ बॅचच्या तृतीय वर्षाच्या डाॅक्टरांना डावलण्यात आले आहे, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. कोविड काळात डाॅक्टरांची कमतरता असताना तृतीय वर्षातील डाॅक्टर विद्यार्थ्यांनीही जीवाची बाजी लावून काम केले. त्यामुळे ऋणनिर्देश निधी देताना कोरोनामध्ये प्रत्यक्ष सेवा दिलेल्या निवासी २०१८, २०१९, २०२० या बॅचचादेखील स्पष्ट उल्लेख करावा, अशी मागणी संघटनेचे डॉ. दीपक मुंडे यांनी केली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या निवासी डॉक्टरांची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांच्या बंधपत्रित सेवा रखडल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळातील सेवाही बंधपत्रित सेवाकाळ म्हणून गणण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही पत्र लिहून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT