मुंबई

अमली पदार्थप्रकरणी नायजेरियनला अटक

CD
अमली पदार्थप्रकरणी नायजेरियनला अटक ३३ लाखांचे कोकेन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २५ ः मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मशीद बंदर परिसरातून ३३ लाखाचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांना मशीद बंदर परिसरात एक नायजेरियन व्यक्ती संशयास्पद रीतीने फिरताना दिसला. पोलिसांनी हटकताच त्याने पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११० ग्रॅम कोकेन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३३ लाख आहे. बोएगा हबीब अबुबकर (वय ४५) असे नायजेरियन आरोपीचे नाव आहे. २०१९ साली तो मुंबईत आला. सध्या तो वसईत राहत असल्याचे तपासात उघड झाले. अंमली पदार्थाची तस्करी करणारी त्याची मोठी टोळी असण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT