मुंबई

मुंबई शहरातील १०१ रस्त्यांसाठी ५६ कोटी

CD
मुंबई शहरातील १०१ रस्त्यांसाठी ५६ कोटी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.२५ : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर १ हजार ८१५ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. मात्र, रस्ते दुरुस्तीचे बाण अजून सुटतच असून मुंबई शहरातील १०१ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. चेंबूर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेने एप्रिल महिन्यात रस्तेदुरुस्तीच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र, अनेक कारणांमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास मंजुरी मिळण्यासाठी डिसेंबर महिना उजाडावा लागला. स्थायी समितीत १ हजार ८१५ कोटी रुपयांच्या रस्तेदुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव येत्या काही दिवसांत स्थायी समितीत सादर होण्याची शक्‍यता आहे. यापुढे जाऊन दक्षिण मुंबईतील पेव्हर ब्लॉकच्या लहान रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. दक्षिण मुंबईतील ६६ लहान रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने २८ कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला आहे. दक्षिण-मध्य मुंबईतील ३५ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २७ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून निविदा जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरायच्या आहेत. चेंबूर परिसरातील २२ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका ४ कोटी ४९ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. अशा साधारण ६० कोटींहून अधिक कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. -------- प्रत्येक किलोमीटरला ४१ लाख दक्षिण मुंबईतील ६९.९९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने २८ कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला आहे. साधारण प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्याला ४१ लाख २१ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Gajkesari Yog Lucky Rashi 2026: नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब पलटणार, 'गजकेसरी राजयोग' देणार मोठं यश

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

SCROLL FOR NEXT