मुंबई

ओमिक्रॉनच्या संकटातही विनामास्क वावर महिनाभरात दोन लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कोविडच्या दोन लाटा आल्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे; मात्र तरीही मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. महिन्याभरात मुंबईतील रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या दोन लाख नागरिकांवर कारवाई करण्यात आली; तर आतापर्यंत ४१ लाखांहून अधिक नागरिकांना दंड आकारण्यात आला आहे.

नववर्ष आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्‍वभूमीवर मुंबईसह राज्यभरात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत; तरीही अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. विशेषतः लहानसहान रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये असे चित्र सर्रास दिसत आहे. महापालिकेने २४ नोव्हेंबरपर्यंत ३९ लाख जणांवर कारवाई करून ७८ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारला होता, तर २४ डिसेंबरपर्यंत ४१ लाख ५६ हजार जणांवर कारवाई करण्यात आली आणि ८२ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेने प्रत्येक प्रभागात ५० असे एक हजार २०० च्या आसपास मार्शल तैनात केले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनाही दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, दंड आकारण्यावरून मार्शल आणि नागरिकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात.

म्हणून होतात वाद
- मार्शल्सना गणवेश परिधान करूनच दंड वसूल करणे बंधनकारक आहे; मात्र अनेक ठिकाणी मार्शल विनागणवेश कारवाई करताना दिसतात.
- मार्शलकडून वाहनांमध्ये बसलेल्या विनामास्क प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो; मात्र काही पावलांवर असलेल्या बाजारांमध्ये मार्शल दंड वसूल करत नाहीत.

...तर वाद टाळता येतील
मुंबईतील अनेक ठिकाणी क्‍लीनअप मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होतात. महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाद होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले; मात्र नागरिकांनी मास्क वापरल्यास असे वादही टाळता येतील, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT