Omicron sakal
मुंबई

संसर्गवाढीमागे डेल्टा की ओमिक्रॉन

खबरदारी घेण्याची वैद्यकीय तज्ज्ञांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णवाढीमागे (Corona Patient) डेल्टा आणि ओमिक्रॉन (Delta And Omicron), दोन्हीच्या संसर्गाची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सध्या रुग्णसंख्या वाढीचा वेग दुप्पट आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल, असे राज्य कृती दलाचे सदस्य डॉ. अविनाश सुपे (Dr. Avinash Supe) यांनी सांगितले. अनेक देशांत कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली आहे.

त्यामुळे आपल्याकडे फेब्रुवारीमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. या काळात चाचण्या वाढविणे आवश्यक असल्याचे सुपे म्हणाले. आपल्याकडे डेल्टा आणि ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. त्याचे तज्ज्ञांनी ‘डेल्मीक्रॉन’ असे नामकरण केले आहे. सध्या त्यावर अभ्यासाची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आवश्यक सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत. ‘घाबरू नका’ राज्य कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, की रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सींग) करायला हवे.

सध्या ओमिक्रॉन रुग्णांची तपासणी सुरू आहे. ते रुग्ण जर का डेल्टा विषाणूचे असतील तर पुढील दोन आठवडे वाट पहावी लागणार असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या एकूण बाधितांपैकी १० ते २० टक्के रुग्णांच्या नमुन्यांचे निर्धारण आवश्यक आहे. सर्व नमुने तपासणे शक्य नाही. यासाठी सामूहिक पद्धती हवी. सध्या रुग्ण लक्षणविरहित आहेत; तर काहींना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे भीतीचे काही कारण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT