मुंबई

सुशोभीकरणही आता महागण्याची शक्यता

CD
महापालिकेच्या संकुलांमधील सुशोभीकरण महागणार शुल्कात पाच टक्के वाढ सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.१ : महापालिकेच्या संकुलांमधील कायमस्वरूपी सुशोभीकरणाच्या शुल्कात पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव या महिन्याच्या महासभेत मांडण्यात आला आहे. तसेच, दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याची परवानगीही प्रशासनाने मागितली आहे. त्यामुळे आता सुशोभीकरणही महागण्याची शक्यता आहे. संकुलांमध्ये कारंजे, सुशोभित हौद, दगडांच्या-खडकांच्या कलाकृती, कृत्रिम धबधबे अशा प्रकारचे सुशोभीकरण करायचे असल्यास महापालिकेच्या किटकनाशक विभागाची परवानगी घ्यावी लागते. तसेच, त्यासाठी शुल्कही द्यावे लागते. यासाठी वार्षिक ६ हजार ५०० रुपये शुल्क, तसेच २० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. या शुल्कात पाच टक्के वाढ करून ते ६ हजार ८२५ रुपये करण्यात येणार आहे. तसेच, अनामत रक्कम २० हजारांवरून २१ हजार रुपये करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे. या वाढीव शुल्कामुळे आर्थिक वर्षात पालिकेला दोन लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांत या शुल्कात वाढ झालेली नाही. मात्र, पालिकेच्या प्रशासकीय खर्चात तसेच महागाईतही वाढ झाली आहे. त्याबरोबर पालिकेच्या सध्याच्या खर्चाच्या तुलनेत विद्यमान स्रोतातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याची गरज आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिकेच्या वतीने या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT