मुंबई

मध्य रेल्वेचे पार्सल लोडिंगमध्ये अव्वल स्थान कायम

CD
पार्सल लोडिंगमध्ये मध्य रेल्वेचे अव्वल स्थान कायम सकाळ वृत्तसेवा ॉमुंबई, ता. १ : शेतकऱ्यांना त्यांचा नाशिवंत शेतमाल (वस्तू) देशातील कानाकोपऱ्यातील बाजारपेठांमध्ये पाठवण्यास किसान रेल्वेची मदत होत आहे. मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून किसान रेल्वे चालवण्यात येत आहे. त्यामुळे पार्सल वाहतुकीत वाढ होत आहे. जून २०२१ पासून मध्य रेल्वेने पार्सल वाहतुकीत पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले; तर डिसेंबर २०२१ मध्येही पार्सल लोडिंग परफॉर्मन्समध्ये मध्य रेल्वेने अव्वल स्थान कायम राखले आहे. मध्य रेल्वेने २०२१ या आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत किसान रेल्वेच्या ६७१ फेऱ्यांमधून २.३८ लाख टन माल वाहून नेला. त्यातून ९०.७६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. किसान रेल्वेच्या सुरुवातीपासून ८९९ फेऱ्यांमधून ३.०९ लाख टनांची मालवाहतूक करून ११९.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मध्य रेल्वेने डिसेंबर महिन्यात २८.०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले; तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत २२९.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. हे मागील आर्थिक वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १५९.७८ टक्के अधिक उत्पन्न आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. --- नॉन-फेअर महसुलातही मध्य रेल्वे अव्वल डिजिटल क्लॉक रूम, ई-वाहन चार्जिंग पॉइंट्स, ॲप आधारित ई-व्हीलचेअर इत्यादी हे नॉन-फेअर महसुलाचे काही प्रमुख उपक्रम आहेत. आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत १९.०३ कोटी रुपये मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ३७८ टक्के जास्त आहे. ------ भारतीय रेल्वेमध्ये मध्य रेल्वेचा तिकीट तपासणीचा महसूल सर्वाधिक मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट/अनियमित प्रवाशांविरुद्ध सुरू ठेवलेल्या मोहिमेमुळे डिसेंबर २०२१ मध्ये ३.३३ लाख प्रकरणे आढळून आली. त्यांच्याकडून १९.५४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत एकूण २४.१९ लाख प्रकरणे आढळून आली. यातून १४४.२३ कोटींचा महसूल प्राप्त झाला. भारतीय रेल्वेच्या सर्व विभागीय रेल्वेमधील सर्वाधिक महसूल मध्य रेल्वेने प्राप्त केला आहे. यासह २७ हजार ८८७ प्रवाशांना मास्क न घातल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT