मुंबई

थर्डीफर्स्टला झोमॅटोचे ''अच्छे दिन''

CD
थर्डी फर्स्टला झोमॅटोचे ''अच्छे दिन'' दिवसभरात २० लाखांहून अधिक ऑर्डर नवी दिल्ली, ता. १ : देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यावर आणि आसन क्षमतेवर बंधने आली आहेत. मात्र, ऑनलाईन फूड डिलिवरीला मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने ''अच्छे दिन'' आल्याचे दिसले. ऑनलाईन फूड डिलिवरी करणाऱ्या झोमॅटोला ३१ डिसेंबरला एकाच दिवसात तब्बल २० लाख (२ मिलियन) ऑर्डर मिळाल्या. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विट करत ही माहिती दिली. वर्षाच्या अखेरीस झोमॅटोला ऑनलाईन फूड डिलिवरीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ९ वाजता झोमॅटोने एकाच दिवसात २० लाख ऑर्डर स्वीकारल्या आणि त्याही पुढे नव्या ऑर्डर मिळतच होत्या. या संपूर्ण ऑर्डरची किंमत जवळपास ९१ कोटी रुपयांवर गेली. दीपिंदर गोयल यांनी ट्विट केले की, आम्ही दोन मिलियन ऑर्डर पार केल्या आहेत. एका दिवसात मिळालेल्या ऑर्डरची ही पहिलीच वेळ आहे आणि अद्यापि दिवस संपायला तीन तास बाकी आहेत. एका दुसऱ्या ट्विटमध्ये गोयल यांनी आपल्या टीम सोबत ऑर्डर ट्रक करत असल्याचा फोटो शेअर केला. नुकतेच झोमॅटोने फूड डिलिवरीचा वार्षिकी अहवाल सादर केला होता. ज्यात भारतात २०२१ मध्ये बिर्याणीला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दर्शवले गेले, दर दोन सेकंदाला झोमॅटोवरून बिर्याणीची ऑर्डर नोंदवली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT