मुंबई

निवासी डॉक्टरांचा संप कायम

CD
निवासी डॉक्टरांचा संप कायम तिसऱ्या दिवशीही ओपीडी सेवेवर परिणाम सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत असतानाही मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला आहे. शनिवारी संपाचा तिसरा दिवस होता. शनिवारीही ओपीडी आणि वॉर्ड सेवेवर परिणाम झाला. नीट पीजी काऊन्सलिंगव्यतिरिक्त, निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या अजूनही विचाराधीन आहेत, ज्या राज्य सरकार अद्याप पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला आहे. मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून बेमुदत संपावर आहेत. या संपामुळे गेल्या तीन दिवसांपासून ओपीडी, वॉर्ड सेवा, शस्त्रक्रिया आदी सेवांवर परिणाम झाला आहे. संपामुळे शुक्रवारी सायन, केईएम आणि नायर रुग्णालयातील १०० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. शनिवारीही असाच प्रकार घडला. केईएम रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष डॉ. सचिन पट्टीवार म्हणाले की, नीट पीजी काउन्सलिंगव्यतिरिक्त, आमच्या अनेक पूर्वीच्या मागण्या विचाराधीन आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. फीमाफीबाबत आम्ही गेल्या महिन्यात आंदोलन केले होते. त्या वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फीमाफीच्या बदल्यात प्रोत्साहनपर निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईवगळता इतर जिल्ह्यांतील निवासी डॉक्टरांना वरील प्रोत्साहनपर रक्कम मिळाली; मात्र आम्हाला अद्याप मिळालेली नाही. याशिवाय, नीट पीजी काऊन्सलिंगच्या प्रक्रियेची तारीख सरकारने जाहीर केलेली नाही. तसेच कनिष्ठ डॉक्टरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही, असेही पट्टीवार यांनी सांगितले.   ---------------------------------------- मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, आम्ही आमचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. मात्र अद्यापपर्यंत आम्हाला सरकारने चर्चेसाठी बोलावले नाही. जोपर्यंत सरकार आमच्याशी चर्चा करत नाही, तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे. ----------------------------- थर्टीफर्स्टच्या रात्री डॉक्टरांचे आंदोलन शुक्रवारी रात्री सर्व जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करत असताना केईएमचे निवासी डॉक्टर त्यांच्या वसतिगृहाच्या आवारात आंदोलन करत होते. आमचे आंदोलन न्यायासाठी असल्याचे डॉ. सचिन पट्टीवार यांनी सांगितले. थर्टीफर्स्टच्या रात्री काही निवासी डॉक्टर हातात बॅनर घेऊन वसतिगृहाबाहेर शांततेत आंदोलन करत होते; तर काही डॉक्टर वसतिगृहाच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर उभे राहून मोबाईल टॉर्च पेटवून निषेध व्यक्त करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT