मुंबई

परीक्षांची काठिण्यपातळी कमी करावी!

CD
परीक्षांची काठिण्यपातळी कमी करावी! दहावी-बारावीसाठी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी मुंबई, ता. १ : राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा आणि त्यातील काठिण्यपातळी कमी करावी, अशी मागणी विनाअनुदानित शाळा कृती समितीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे केली आहे. यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने आणि कोरोनामुळे भीतीचे वातावरण असल्याने या परीक्षा बहुपर्यायी आणि कृतीपत्रिकेवर भर देणाऱ्या ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यानंतरच शाळा सुरू झाल्या असून असंख्य शाळांचा अजूनही अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकांसाठीची तयारीही अपूर्ण राहिलेली आहे. त्यातच शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी नियमित शाळेत येण्यासाठी महिन्याचा कालावधी लागला. तोंडावर आलेल्या बोर्डाच्या परीक्षा पाहता कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची शिक्षकांची कसोटी आहे. कमी कालावधीत संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना प्रचंड दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षेचे स्वरूप सोपे असावे; जेणेकरून सर्वसाधारण विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवता आली पाहिजे, असे मत राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय डावरे यांनी व्यक्त केले. --- शिक्षकांना निकालाची चिंता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्टोबर महिन्यापर्यंत शाळा बंद होत्या. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम झाल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय मोडली; तर तब्बल ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्याचा मोठा फटका दहावी-बारावीच्या निकालाच्या टक्क्यांवर होणार असल्याची भीती शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT