मुंबई

सराईत मोबाईल चोर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

CD
सराईत मोबाईल चोर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात मानखुर्द, ता. १ (बातमीदार) ः वाशी रेल्वे पोलिसांनी बुधवारी (ता.२९) सराईत मोबाईल चोराला अटक केली. अमन सिंग (वय २७) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मोबाईल चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यातदेखील त्याच्याविरोधात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक शाखेने चोरी झालेला मोबाईल ट्रेस केला. त्या माहितीच्या आधारे वाशी परिसरातून जिगर आलम (वय २१) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला. जिगरकडे चौकशी केली असता त्याने हा मोबाईल अमन या मित्राकडून घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे अमनचा मोबाईल ट्रेस करून शोध घेण्यात आला. अखेर त्याला बुधवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली होती. पोलिसांनी या कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत त्याने आणखी तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याने चोरलेले एकूण चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Marathi News Live Updates: पुणे-अहिल्यानगर रोडवर भीषण वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT