मुंबई

जिओ व एअरटेलकडून ओटीटी सबस्क्रिप्शनचा प्लॅन

CD
जिओ व एअरटेलकडून ओटीटी सबस्क्रिप्शनचा प्लॅन नवी दिल्ली, ता. २ ः देशात ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार, झी ५, सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला जास्त ग्राहक आहेत. या सर्व ओटीटींचे सबस्क्रिप्शन घेतले तर महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, पण आता जिओ आणि एअरटेल या दोन दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या पोस्टपेड प्लॅनममध्ये या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे. रिलायन्स जिओकडून सहा पोस्टपेड प्लॅन जारी करण्यात आले आहेत. त्यात पाच पोस्टपेड प्लस प्लॅन, तर एक रेग्युलर प्लॅन आहे. १९९, ३९९, ५९९, ७९९, ९९९, १४९९ रुपये असे हे प्लॅन आहेत. या सर्व प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार यांचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग, फ्री जिओ प्राईम, रोज १०० एसएमएसचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या तिन्हीच्या मासिक सबस्क्रिप्शनचा मासिक खर्च ६२७ रुपये आहे. तर एअरटेलकडे चार पोस्टपेड प्लॅन आहेत. यात ३९९, ४९९, ९९९, १५९९ चे प्लॅन्स आहेत. या प्लॅन्सवर कंपनी अॅमेझॉन प्राईम आणि डिज्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देत आहे. यासोबतच फ्री एअरटेल एक्स्ट्रीम ॲप, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसचे सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनचा मासिक सबस्क्रिप्शनचा मासिक खर्च ४७८ रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर ,भुसावळ, रावेर यावल तालुक्यातील बाजारात मक्याची आवक वाढली

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर भयानक अपघात ; २५ वाहनं एकमेकांना धडकली, चौघांचा मृत्यू

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

SCROLL FOR NEXT