मुंबई

पूर्व द्रुतगती मार्गावर फ्लेमिंगोंच्या प्रतिकृती

CD
पूर्व द्रुतगती मार्गावर फ्लेमिंगोंच्या प्रतिकृती मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः महाराष्ट्र सरकारने भांडुप येथील पंपिंग स्टेशनला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने मुलुंडच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील ऐरोली पुलाजवळ फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतिकृती बसवल्या आहेत. त्या सुंदर प्रतिकृती वाहनचालक आणि पादचाऱ्यांना आकर्षित करत आहेत. अभयारण्याबाबत प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात आली असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजनांचा अवलंब करण्यात येत आहे. दरम्यान, मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गाच्या जंक्शनच्या मध्यभागी फ्लेमिंगोंच्या आकर्षक प्रतिकृती उभारल्या आहेत. भांडुप पंपिंग स्टेशनजवळील अभयारण्यामध्ये दरवर्षी पर्यटक आणि पक्षीनिरीक्षक येतात. जगभरातील विविध पक्षी येथे पाहता येतात. फ्लेमिंगो हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे. या अभयारण्यात फ्लेमिंगोंशिवाय, ग्रीन शँक, ब्राह्मणी काईट्स, लिटिल एग्रेट, सीगल्स, कॉमन सँडपायपर, पेंटेड स्टोक्स इत्यादी दुर्मिळ प्रजातींचे पक्षीही आहेत. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT