मुंबई

शिवसेनेच्या जत्रोत्सवावर पालिका प्रशासनाचे मौन

CD
शिवसेनेच्या जत्रोत्सवावर पालिका प्रशासनाचे मौन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : संपूर्ण राज्यभरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात आहे; मात्र अंधेरीतील डी. एन. नगरातील पालिका मैदानावरील शिवसेनेच्या मालवणी जत्रोत्सवावर पालिका प्रशासनाने मौन पाळले आहे. हा महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात झाला, पण प्रशासनाने काय कारवाई केली, याबाबत प्रशासन स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; तर इतर अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ओमिक्रॉन आणि कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नियमावली पाळण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील पर्यटन स्थळे नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती; मात्र अशा स्थितीत अंधेरीत शिवसेनेचा मालवणी जत्रोत्सव सुरू होता. याचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. ... ‘स्वतःच्या घराकडेही लक्ष द्या’ भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जत्रोत्सवावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. लोकांना सल्ले द्यावेत, पण स्वतःच्या घराकडेही लक्ष द्यावे, असा टोला भातखळकर यांनी लगावला. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT