मुंबई

राज्यभरात मुलांचे लसीकरण

CD
मुलांनो घाबरू नका, लस घ्या! राज्यभरात आजपासून मुलांचे लसीकरण सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : राज्यभरात सोमवारपासून (ता. ३) १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची लसीकरण मोहीम सुरू होत असून ६५० केंद्रे त्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. राज्यात ६० लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. मुंबईत साधारण नऊ लाख मुलांना लस द्यायचे उद्दिष्ट आहे. राज्यभरातील ६५० केंद्रांवर मुलांसाठीच्या लसीकरणाची वेगळी व्यवस्था केली असल्याचे राज्य लसीकरण अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. महिन्याला २० लाख मुलांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. पुढील तीन महिन्यांत राज्यातील सर्व १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे देसाई यांनी सांगितले. लसीकरणाला लहान मुलांचा प्रतिसाद कसा असेल हे आताच सांगणे कठीण आहे. त्यासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर एक आठवडा निरीक्षण करू असेही देसाई म्हणाले. लहान मुलांवर जबरदस्ती करू शकत नाही. त्यांच्या पालकांनी त्यांना लसीकरणासाठी उद्युक्त करणे गरजेचे असून त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात ६५० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून दिवसाला १० ते १२ लाख मुलांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. आवश्यकता भासल्यास दैनंदिन १५ लाख लाभार्थींचे लसीकरणही यशस्वीपणे करता येऊ शकते. सध्या राज्यात सव्वा कोटी लाभार्थींचे लसीकरण एका दिवसात केले जाते. ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचाही निर्णय झाला असून त्याची सुरुवात १० जानेवारीपासून होत आहे. ज्यांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्येष्ठ नागरिक लस घेऊ शकणार आहेत. आपल्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच बूस्टर डोस घ्यावा, असे देसाई यांनी सांगितले. केंद्रावर आरामाची व्यवस्था राज्यात लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी मुलांसाठी ६५० केंद्रांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच केंद्रांवर लहान मुलांचे लसीकरण होत आहे. लसीकरणामुळे मुलांना कोणताही धोका नाही. काही सौम्य लक्षणे जाणवल्यास आराम करण्याची व्यवस्थाही केंद्रात असेल. शिवाय पालकांना मुलांसोबत थांबता यावे म्हणून त्यांच्यासाठीही रेस्ट रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT