मुंबई

लस न घेताच त्याने काढला पळ काढणार अजुनही बेपत्ता

CD
लस न घेताच पळ काढलेल्या तरुणाचा १२ दिवसांनंतरही शोध नाही डोंबिवली, ता. ३ ः एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ओमिक्रॉनचा धोकाही वाढला आहे. यामुळे लसीकरणावर पुन्हा जोर दिला जात आहे. १२ दिवसांपूर्वी डोंबिवलीतील लसीकरण केंद्रावर नावनोंदणी करून लस न घेताच पळून गेलेल्या ऋषीकेश मोरेचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. केवळ त्याचा मोबाईल नंबर आरोग्य विभागाकडे असून तो नंबरही उचलला जात नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेहरू मैदान येथील लसीकरण केंद्रावर २३ डिसेंबरला ऋषीकेश मोरे हा तरुण लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आला होता. नावनोंदणी केल्यानंतर लस घेण्यास टाळाटाळ करत त्याने आरोग्य केंद्रावरून पळ काढला होता. त्या तरुणाचा शोध घेत त्याचे लसीकरण केले जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, या घटनेला १२ दिवस उलटले तरी पालिकेला त्याचा शोध घेता आलेला नाही. आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नावनोंदणीच्या वेळेस या तरुणाचा केवळ मोबाईल क्रमांक आरोग्य विभागाकडे आहे. त्याचा निवासी पत्तादेखील नसल्याने नोंदणी कशा पद्धतीने केली गेली. त्या व्यक्तीचे महत्त्वाची कागदपत्रे तपासली गेली की नाही, त्यातील आधार कार्डचा नंबर प्रशासनाकडे नाही का? असे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न सजग नागरिक विचारत आहेत. दरम्यान त्या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही, तसेच त्याला संदेश पाठवूनही त्यास त्याने प्रतिसाद दिला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT