मुंबई

गिर्यारोहकांचा पर्यावरण वाचवा संदेश

CD
एक हजार फूट उंचीचा वधन-वानरलिंगी कडा सर कल्याणच्या गिर्यारोहकांचा पर्यावरण वाचवा संदेश सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ३ ः नाणेघाटाच्या बाजूलाच असलेल्या जीवधन किल्ला आणि त्याच्याच बाजूला सुमारे २०० फूट लांब असलेल्या वानरलिंगी सुळका या कड्यांमध्ये तब्बल हजार फूट खोल दरी आहे. हे अंतर झिप्लायनिंगच्या मदतीने कल्याणच्या भूषण पवार व नीतेश पाटील या दोघा गिर्यारोहकांनी पार करत पर्यावरण वाचवा, असा संदेश दिला आहे. मानवाने स्वार्थासाठी गड, किल्ले, सुळक्यांचे उत्खनन करून त्यांचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन, यासोबतच पर्यावरणाचे देखील संवर्धन होणे आवश्यक असल्याने, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंगच्या सहाय्याने हे गड, सुळका सर करून सामाजिक संदेश देण्याचे काम केले जात असल्याचे गिर्यारोहक भूषण पवार यांनी सांगितले. किल्ल्याच्या दुसऱ्या कड्यावरून समोर ४५० फुटांचा वानरलिंगी सुळका दिसतो. सुरक्षिततेला प्राधान्य देत दोन्ही सुळक्यांचे टोक गाठून सुमारे २०० फूट लांबीचे हे अंतर दोघांनी पार केल्याचे भूषण यांनी सांगितले. या मोहिमेत त्यांना एसएल ॲडव्हेंचरच्या लहू उघडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली. राज्यात ठिकठिकाणी असलेल्या गड-किल्ले, सुळके आदींचे मानवाने उत्खनन करून त्यांचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. त्यात सर्वप्रथम श्री हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी किल्ल्याचे. त्यांचे संवर्धन व पर्यावरण वाचविण्यासाठी आम्ही अशा ट्रेकचे आयोजन करत असल्याचे भूषण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : ज्योतिबा मंदिर मारहाण प्रकरणी पुजारी, भाविकांसह ३० जणांवर गुन्हा दाखल

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT