मुंबई

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

CD
भारतरत्नसाठी विद्यार्थिनींची स्वाक्षरी मोहीम घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वाक्षरी मोहीम राबवली. संचालक राजेश सुभेदार आणि मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली. अनेक वर्षे सामाजिक संस्था, संघटना व महिला सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित असलेल्या मुलींना व महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप हाल सोसले. त्यामुळे भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, या मागणीसाठी आज ४ थी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींनी कपाळाला आडवी पट्टी लावून सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा साकारली. तसेच अडीचशेहून अधिक मुलींनी स्वाक्षरी करून भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली. या स्वाक्षऱ्या आम्ही पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयांना पाठविणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel LPG Price: महागाईने हैराण जनतेला आणखी झटका? गॅस सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; गॅस-पेट्रोल-डिझेल महागणार?

वडिलांचं पार्थिव समोर, मला पाहताच आईने हंबरडा फोडला... अविनाश नारकरांनी सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग

WhatsApp वर फक्त 'Hi' पाठवा आणि घरबसल्या मिळवा PF पासबुक; EPFO ची नवीन डिजिटल सुविधा सुरू!

Amravati : मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीवर मटण पार्टी, ड्रोन शूट करणाऱ्याला मारहाण; नगरसेवकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : महापौर दालनाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवक यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT