मुंबई

आश्रमशाळेतील मुलांना स्वेटर वाटप

CD
आश्रमशाळेतील मुलांना स्वेटरचे वाटप कासा, ता. ३ (बातमीदार) ः३ डिसेंबर २०२१ पासून डहाणू तालुक्यातील १९ दत्तक घेतलेल्या बहारे, बहारे- सागपाडा, बहारे-डोंगरीपाडा, बहारे- पारसपाडा, वंकास, वंकास- वाघाईपाडा १, वंकास-वाघाईपाडा २, धामणगाव, चिखलीपाडा, सोगावे, सोगावे-पाटीलपाडा, सोगावे-डोंगरीपाडा, सोगावे- धोदडेपाडा, पारसवाडी, पारसपाडा, जामशेत-पाटीलपाडा, जामशेत -मांगत पाडा, जामशेत - डोंगरीपाडा, रानशेत, कोल्हाण, कोसेसरी अशा १९ जिल्हा परिषद शाळांसाठी लुधियानामध्ये खास तयार केलेल्या ३००० नवीन स्वेटर्सचे रोशनी फाऊंडेशन आणि चॕरिटेबल ट्रस्ट मुंबईने मोफत वाटप केले. यामुळे हिवाळा सुरू झाल्याबरोबर वंचित आदिवासी मुलांना उच्च दर्जाचे स्वेटर मिळाले. तसेच विद्यार्थिनींना नवीन निर्यात दर्जाचे लेगिंगचेही वाटप करण्यात आले. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना पाट्या देण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केळी देण्यात आली. ट्रस्ट दत्तक घेतलेल्या शाळेतील मुलांना दर दोन वर्षाने एकदा नवीन स्वेटर्सचे वाटप कले जाते. गावकऱ्यांना हिवाळ्यातील थंडीपासून बचाव करणाऱ्या वस्तूंचेही या वेळी वितरण करते. वाटपासाठी रोशनी फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त गीता मुछाला व अध्यक्ष संजीव मुछाला, ट्रस्टचे सदस्य दिलीप कवैया, योगिनी त्रिवेदी, कर्मचारी राजू वावरे, जयसिंग वावरे हे शाळांना भेटी देऊन एक वाटपाचे नियोजन करून एक सामाजिक सेवाच करत आहेत. स्वेटर, लेगिंग व पाटी मिळाल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालक समाधान व्यक्त करून ट्रस्टला धन्यवाद देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT