मुंबई

मिरा भाईंदरमधील नागरिकांनाही करमाफी द्यावी

CD
मिरा भाईंदरमधील नागरिकांनाही करमाफी द्यावी सभागृह नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाचा लाभ मिरा भाईंदरमधील नागरिकांना देण्यात यावा, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जाहीर केला आहे. याच धर्तीवर मिरा भाईंदरमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता कर माफ करून इथल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापालिकेतील सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मिरा भाईंदरमधील नागरिकांना सरकारच्या मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमधील नागरिकांना मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, प्रशासनाने तो विखंडित करण्यासाठी सरकारकडे पाठवला. राज्य सरकारने आजपर्यंत या प्रस्तावावर निर्णय घेतलेला नाही, असे दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: सवलतीत एसटीने प्रवास करता? १ ऑगस्टपासून हा नियम माहिती नसेल तर फटका बसू शकतो

Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Yogi Avimukteshwaranand: योगी आदित्यनाथ - अविमुक्तेश्वरानंद वाद विकोपाला; ‘शंकराचार्य’ पदवीवर प्रश्‍नचिन्ह आणि गायीच्या दर्जावरून मतभेद

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज किती आहे दर?

Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

SCROLL FOR NEXT