मुंबई

लस न घेता पळ काढलेल्या

CD
ही बातमी वाचलेली नाही... आधी एक सेम बातमी वाचून गेली आहे. पुरोहित ------------------------------------- लस न घेता पळ काढलेल्या तरुणाचा अद्याप पत्ता नाही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ३ : ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या यांना रोखण्यासाठी राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, काही जण लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. डोंबिवलीतील लसीकरण केंद्रावरून नाव नोंदणी करून पळ काढलेला ऋषीकेश मोरे अद्यापि सापडलेला नाही. त्याचा केवळ मोबाईल क्रमांक पालिकेच्या आरोग्य विभागाकडे असून तो फोनच उचलत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाले आहे. पालिकेच्या नेहरू मैदान लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी नाव नोंदणी करून ऋषीकेश मोरे या तरुणाने २३ डिसेंबरला लस न घेताच पळ काढला. या तरुणाचा शोध घेऊन त्याचे लसीकरण केले जाईल असा दावाही पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, या घटनेला १२ दिवस उलटूनही पालिकेला तरुणाचा पत्ता लागलेला नाही. पालिकेला त्याचा शोध लागला नाही की शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. नाव नोंदणीवेळी त्या व्यक्तीची महत्वाची कागदपत्रे तपासली गेली की नाही, त्याच्या आधारकार्डचा क्रमांक प्रशासनाकडे आहे की नाही? असे अनेक प्रश्न प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले जात आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिका प्रशासन किती जागृत आहे हेच यावरून स्पष्ट होते. त्या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही, तसेच त्याला संदेश पाठवूनही त्याला त्याने प्रतिसाद दिला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT