मुंबई

येऊरच्या आदिवासी विद्याथ्र्यांना मिळणार शुद्ध पाणी

CD
येऊरच्या आदिवासी विद्यर्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी पालिका शाळेत बसवले तीन फिल्टर सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ३ ः ठाणे पालिकेच्या येऊर येथील शाळेत आदिवासी पाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. दिशा ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील प्रत्येक मजल्यावर वॉटर फिल्टर बसवण्यात आले असून नवीन वर्षाची ही भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. कोरोना काळात तब्बल दीड वर्षे बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या. शाळेत विद्यार्थ्यांची लगबग सुर झालेली असतानाच त्यांच्या आरोग्यविषयक दैनंदिन सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी हा मूलभूत प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांची हीच गरज ओळखून दिशा ग्रुपचे संस्थापक भास्कर बैरीशेट्टी व स्थानिक शिवसेना नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या संकल्पनेतून येऊर येथील पालिका शाळा क्रमांक ९ मध्ये ॲक्वागार्ड बसवण्यात आले. आधीच येऊरच्या अनेक आदिवासी पाड्यांवर शुद्ध पाण्याची मोठी वानवा असल्याने भास्कर बैरीशेट्टी यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या शाळेच्या तिन्ही मजल्यांवर प्रत्येकी एक ॲक्वागार्ड मशीन बसवून विद्यार्थी व शिक्षकांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुखद धक्का दिला. पाठीवरील बाटलीचे ओझे कमी होणार बैरीशेट्टी यांनी वर्तकनगर येथील थिराणी शाळेतही अशाच पद्धतीने ॲक्वागार्ड मशीन बसवले होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करण्यासाठी तसेच त्यांना शुद्ध पाणी शाळेत उपलब्ध व्हावे या हेतूने शाळांमध्ये ॲक्वागार्ड बसवण्यात आल्याचे बैरीशेट्टी यांनी सांगितले. या वेळी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, शिवसेनेच्या विभागीय संघटक वैशाली शिंदे, महिला शाखा संघटक पूजा हिंदोळे, समाजसेविका खिल्लारे, शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. वायफायही बसवणार विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता येऊरच्या या शाळेत विनामूल्य वायफाय सेवा दिशा ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. भविष्यात ऑनलाईन शिक्षण, प्रोजेक्टर वापर तसेच इतर डिजिटल अध्यापनासाठी या वायफाय सेवेची आवश्यकता असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT