मुंबई

मामेभावाने केले लैगिक शोषण, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा

CD
लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीला अटक घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम असणाऱ्या आणि त्यातून ही मुलगी गरोदर राहिल्यावर फरारी झालेल्या आरोपीला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा पीडित मुलीचा मामेभाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये आरोपी आणि पीडिता राहते. ही मुलगी १७ वर्षांची असून, याच भागातील नालंदा नगर परिसरात आरोपी राहतो. आरोपी हा पीडित मुलीच्या चुलत मामाचा मुलगा आहे. या मुलीचे आणि आरोपीचे एकमेकांवर प्रेम होते; परंतु मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. ही बाब घरी माहीत झाली तर कुटुंबीय रागावतील म्हणून तिने यू-ट्युबवर गर्भपाताच्या औषधांची माहिती घेतली. त्यानंतर एका मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्या आणून २० डिसेंबरला त्यांचे सेवन केले. पाच दिवसांनी या मुलीला जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने चक्कर येत होती. मात्र ही बाब मुलीने कोणालाही सांगितली नाही. ३० डिसेंबरला जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊन चक्कर आल्याने तिच्या भावाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याने तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ३१ डिसेंबरला दाखल केले. त्यावेळी मुलीने डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पंतनगर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर शनिवारी (ता. १) महिला पोलिस अधिकारी पौर्णिमा हांडे यांनी मुलीचा राजावाडी रुग्णालयात जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT