मुंबई

नगरपंचायतच्या ४ जागासाठी १७ अर्ज दाखल

CD
शहापूर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १७ अर्ज शहापूर, ता. ३ (बातमीदार) ः शहापूर नगरपंचायतीतील चार जागांसाठी १७ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण असलेल्या या चार जागांसाठी ओबीसी उमेदवार रिंगणात उतरविण्याची विविध पक्षांनी केलेली घोषणा पाळल्याचे दिसून आले. आज शिवसेनेच्या वतीने अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शक्ती प्रदर्शन करीत प्रचार रॅली काढण्यात आली. वार्ड क्रमांक ६ मध्ये शिवसेनेतर्फे सुविधा विनोद भोईर, तर भाजपच्या विमल रघुनाथ पष्टे, तर राष्ट्रवादीतर्फे वैशाली विनायक सापळे यांचा अर्ज दाखल केला आहे. वार्ड क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे सुभाष शांताराम विशे, भाजपचे हरेश पष्टे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतर्फे स्वाती दत्तात्रय विशे यांनी अर्ज दाखल केला आहे. वार्ड क्रमांक १० मध्ये शिवसेनेचे विजय मनोहर भगत, तर काँग्रेसकडून अपर्णा खाडे यांनी अर्ज दाखल केला. येथे भाजपचा उमेदवार न ठरल्याने भाजपच्या आनंद अधिकारी, डॉ. अरुण झंवर व मंदार काबाडी यांचे अर्ज आले आहेत. भाजपचा अधिकृत उमेदवार नंतर जाहीर करण्यात येणार आहे. वार्ड क्रमांक १६ मधून सेनेकडून मयुरी सुनील म्हात्रे, भाजपकडून मनीषा सतीश अधिकारी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT