मुंबई

जॉन अब्राहम, एकता कपूरला कोरोना

CD
जॉन अब्राहम, एकता कपूरला कोरोना प्रेम चोप्रा, उमा चोप्रा यांच्यावरही ‘लीलावती’मध्ये उपचार मुंबई, ता. ३ ः बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम, मालिका निर्माती एकता कपूर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. एकता कपूरने तिच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवरून कोरोनाची बाधा झाल्याची बातमी ‘शेअर’ केली आहे. एकता हिच्यावरील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या ती घरी अलगीकरणात आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया यांना कोरोनाची बाधा झाली असून ते दोघे घरी अलगीकरणात आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोघांवरही वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती चांगली आहे. एक ते दोन दिवसांत त्यांनी घरी सोडण्यात येईल, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Titwala Train Accident : भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे; मृत व्यक्तीचे अवयव बाहेर काढण्यासाठी कापला कॅटल गार्ड, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT