मुंबई

लसीकरणास पहिल्याच दिवशी गर्दी

CD
लसीकरणास पहिल्याच दिवशी गर्दी डोंबिवली, ता. ३ : १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्यात दिवशी विद्यार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली. कल्याण-डोंबिवलीत रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम, शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम, सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व, शक्तिधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व, आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम, मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, यादव नगर रोड, आंबिवली या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरणाची सोय करण्यात आली होती. काही केंद्रावर सकाळी १० पासून आलेल्या विद्यार्थ्यांचा दुपारी २ वाजले तरी नंबर न आल्याने मुले वैतागलेली दिसत होती. ऑनलाईन व ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या वेगळ्या रांगा, लहान मुले असल्याने त्यांना बसण्याची सोय तसेच दिवसाला किती विद्यार्थ्यांना लस दिली जाणार हे पालिकेने निश्चित करावे, अशी प्रतिक्रिया यावेळी पालकांनी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात पहिल्याच दिवशी २ हजार ६५३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Price Drop : पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? अमेरिका- इराणमधील तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल नव्हे! हे नैसर्गिक असल्याचा तज्ञांचा दावा, मग जांभूळ जास्त का येते?

Rajya Sabha Majority: ‘एनडीए’ दोन तृतीयांश बहुमताजवळ, राज्यसभेतील संख्याबळ वाढणार; इंडिया आघाडीचे बळ घटले, महाराष्ट्रातील २ पक्षात भूकंप?

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

SCROLL FOR NEXT