मुंबई

रिपेअर बोर्डाच्या रहिवाशांचे दैवतांना साकडे घालून आंदोलन

CD
रिपेअर बोर्डाच्या रहिवाशांचे दैवतांना साकडे घालून आंदोलन मालाड, ता. ४ (बातमीदार) ः मालवणीतील गायकवाडनगर येथील रिपेअर बोर्डत्या रहिवाशांनी काल (ता. ३) पासून आंदोलन छेडले आहे. कोणीच वाली उरला नसल्याने रहिवासी आपापल्या दैवतांना साकडे घातले आहे. म्हाडाने ६ ते ८ लाखांची थकबाकी वसूल करण्याची नोटीस पाठविली आहे. या लाखो रुपयांच्या नोटिशी बघून नागरिक हतबल झाले आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या या नागरिकांना म्हाडाने न्याय द्यावा, अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांना म्हाडाने योग्य दंड आकारून सवलतीच्या दरात खोली अलॉट करावी, यासाठी रहिवाशांनी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भेटीही घेतल्या आहेत. तसेच मालवणी विभाग अल्पसंख्याकबहुल विभाग असल्याने या विषयाकरिता महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगासही निवेदन देण्यात आले आहे; तरी कोठेच योग्य न्याय मिळत नसल्याने आता रहिवाशांनी आपापल्या दैवतांना साकडे घालण्याचे योजिले आहे. त्याची सुरुवात दिनांक ३ जानेवारीपासून प्रार्थना, कुराण पठण करून करण्यात आली आहे. दर आठवड्यातून दोन वेळा विविध धार्मिक पूजाअर्चा करून न्याय मिळण्याकरिता तसेच लोकप्रतिनिधींच्या मनात रहिवाशांप्रति दया निर्माण व्हावी व प्रश्न सुटावा, यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे गायकवाडनगर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT