मुंबई

कोविडसाठी औषध खरेदी

CD
कोविडसाठी महापालिकेची औषधखरेदी ॊॊ‘मोलनुपीरवीर’ औषधालाही परवानगी; निविदा मागवल्या सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ : ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्यावर महापालिकेने कोविडविरोधात यंत्रणा कामाला लावली आहे. पालिकेतर्फे १०७ प्रकारची औषधे, १०० प्रकारची इंजेक्शन विकत घेण्यात येणार आहेत. तसेच भारतीय औषध नियंत्रकांनी गेल्या आठवड्यात परवानगी दिलेले मोलनुपीरवीर या ॲन्टिव्हायरल औषधाचीही खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. अमेरिकेनंतर भारताने मोलनुपीरवीर या औषधाला परवानगी दिली आहे. गेल्याच आठवड्यात ही परवानगी मिळाल्यानंतर पालिकेने तात्काळ या औषधाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या महत्त्वाच्या औषधांसह पालिका तब्बल १०७ प्रकारची विविध औषधे विकत घेणार आहे. यात गोळ्यांसह सीरपचाही समावेश आहे. साधारण तापाची पॅरासिटामोल, व्हिटॅमिन्स गोळ्यांसह सर्व प्रकारच्या गोळ्यांची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच १०० प्रकारच्या इंजेक्शनचीही खरेदी करण्यात येणार आहे. कोविडसाठी लागणारी अनेक औषधे पालिका रुग्णालयात नियमित वापरली जातात. त्यामुळे त्यांची खरेदी केली जात आहे. तसेच राज्याच्या कोविड टास्क फोर्सने काही नव्या औषधांची शिफारस केली आहे. त्यांचीही खरेदी करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. --- खाटांचेही व्यवस्थापन औषध खरेदीबरोबरच खाटांचेही व्यवस्थापन करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सध्या कोविडच्या रुग्णांसाठी ३० हजार खाटा उपलब्ध आहेत; तर विलगीकरणासाठी २२ हजार खाटा तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर महापालिकेने यापूर्वी विलगीकरणासाठी वापरलेल्या इमारतींची पाहणी सुरू केली आहे. खाटा तयार करण्याबरोबर त्यांच्या नियोजनासाठीही पूर्वीप्रमाणे कोविड वॉर रूममध्ये शिकाऊ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT