मुंबई

ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला

CD
दुकानदारांना दंडआकारणीचा निर्णय रद्द करा मुंबई भाजप व्यापारी सेलची पालिकेकडे मागणी मुंबई, ता. ४ ः दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क न लावल्यास दुकानदाराला मोठा दंड आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मुंबई भाजप व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने नुतीच अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन ही मागणी केली. दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याला फक्त ५०० रुपये दंड आकारला जाईल, पण संबंधित दुकान अथवा आस्थापनेला १० हजार रुपयांचा दंड करण्याचा सरकारचा आदेश आहे. तो आदेश राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांना १० हजारांचा दंड म्हणजे लूटच असल्याची टीकाही लोढा यांनी या वेळी केली. हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयामुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच लहान दुकानदारांची गैरसोय होणार आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल, याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. या वेळी मुंबई भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष जयेश जरीवाला, जयेश जोशी, अल्पेश शहा, प्रदीप शर्मा, सवेश प्रतापसिंह आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hinjawadi Metro Line 3 Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो!

शाळेत घुसून दहावीच्या दोन मुलींवर करवतीने हल्ला; एकीची प्रकृती गंभीर, आरोपी अटकेत

फाइव्ह स्टार हॉटेलच्या स्विमींगपूलमध्ये उतरले, शॉक लागून २ परदेशी नागरिकांचा मृत्यू; वाचवायला गेलेले दोघे जखमी

Marathi News Live Updates : दिल्लीत १ नोव्हेंबरला काँग्रेस आणि भाजप आमनेसामने; रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, तर भाजपचेही जोरदार शक्तीप्रदर्शन

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SCROLL FOR NEXT