मुंबई

ठाण्यातील फुलविक्रेत्या मुलीचे अपहरण

CD
अपहरण झालेल्या फुलविक्रेत्या मुलीचा शोध लागला आश्रयास असलेल्या मुलीनेच केले अपहरण सकाळ वृत्तसेवा, ठाणे : ता, ४ ः फुलविक्रेत्याच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना नौपाडा पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे. मुलीने दाखिवलेल्या चातुर्याने आणि नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने तिची सुटका झाली आहे. नौपाडा पोलिसांनी या मुलीला दिल्लीहून विमानाने ठाण्यात आणले. आता ज्योतीचा शोध मात्र सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलीसांनी दिली. १३ वर्षीय मुलगी ही तिचे आई- वडील आणि तीन भावंडांसोबत कळवा येथील भास्करनगर भागात राहते. सध्या शाळा बंद असल्याने ही मुलगीही तिच्या आई-वडिलांना फुल विक्रीच्या व्यवसायामध्ये मदत करत होती. २९ डिसेंबर २०२१ ला ती फुलविक्री करत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या आई वडीलांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती परिसरात आढळून आली नाही. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा प्रकार नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. यावेळी त्या मुलीच्या आई- वडिलांची चौकशी केली असता, त्यांच्या घरी दोन ते तीन दिवसांपूर्वी दिल्लीहून ज्योती ही तरुणी आश्रयाला असल्याचे समोर आले. मुलगी आणि ज्योतीही एकाच दिवशी गायब झाल्याची माहिती पोलिसांना दिली. रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच हमालांची चौकशी केली. त्यावेळी एक लहान आणि मोठी मुलगी फलाटावर दिसल्याचे त्या हमालाने पोलिसांना सांगितले. त्या दिवशी दिल्लीला गेलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती पोलिसांनी मिळविली. दिल्ली पोलिसांनाही या घटनेची माहिती तात्काळ दिली. १ जानेवारीला अचानक मुलीच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर दिल्लीतील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून फोन आला. त्या व्यक्तीने तुमची मुलगी दिल्ली येथील द्वारका भागात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तो व्यक्ती तिला तात्काळ दिल्ली येथील द्वारका पोलीस ठाण्यात घेऊन गेला. मुलीच्या वडिलांनीही याची माहिती नौपाडा पोलिसांना दिली. मुलीच्या आई-वडिलांची ओळख पटविण्यासाठी द्वारका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नौपाडा पोलिसांना व्हिडीओ कॉल केला. मुलीने हेच आपले आई-वडिल असल्याचे सांगितल्यानंतर द्वारका पोलिसांनी तिचा ताबा घेतला. संजय धुमाळ यांनी तात्काळ तीन अधिकाऱ्यांना विमानाने दिल्लीला पाठविले. पोलिसांनी मुलीचा ताबा घेतल्यानंतर ज्योतीसोबत ती कोणत्या हॉटेल तसेच ठिकाणी वास्तव्यास होती याची माहिती घेतली. मात्र ज्योती पोलिसांना आढळून आली नाही. मंगळवारी पोलिसांनी या मुलीला विमानाने पुन्हा ठाण्यात आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

Latest Marathi News Live Update : विठ्ठल-रुक्मिणी पूजेची बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

SCROLL FOR NEXT