मुंबई

उल्हासनगरात १ कोटींच्या निधीतून दुर्लक्षित उद्यानाला ऐतिहासिक झळाळी

CD
भाईसाहब मेहरवान सिंग उद्यानाचे उद्‍घाटन खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः कॅम्प नंबर ३ हिराघाट चौकाजवळील मोकळ्या जागेत महापालिकेने भाईसाहब मेहरवान सिंग उद्यान विकसित केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उद्यानाचे लोकार्पण केले आहे. यासाठी त्यांनी एक कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून या उद्यानाला ऐतिहासिक झळाळी मिळेळ अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक अनेक वर्षांपासून हे उद्यान दुर्लक्षित ठेवण्यात आल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. भूमाफियांचा त्यावर डोळा होता. हे बघून आणि या परिसरात एकही उद्यान नसल्याने साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. ५० लाखांच्या निधीतून उद्यानाचे सुशोभीकरण करून उद्यान नागरिकांसाठी खुले केले; मात्र या उद्यानासाठी बराच खर्च येत असल्याने जीवन इदनानी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे एक कोटीच्या निधीची मागणी केली होती. डॉ. शिंदे यांनी उद्यानाला निधी उपलब्ध करून दिला. उद्‍घाटनप्रसंगी महापौर लीलाबाई आशान, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाईसाहब जसकिरत सिंग, त्रिलोक सिंग, माजी महापौर आशा इदनानी, विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे, नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्रसिंह भुल्लर, कलवंतसिंग सोहता, विजय पाटील, किशोर वनवारी, नगरसेविका इंदिरा उदासी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT