मुंबई

लॉकडाऊन मधील लाईफ स्टाईल मुळे डोळ्यांसोबत आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

CD
डोळ्यांसोबत आरोग्याच्या तक्रारी वाढल्या! आरोग्य शिबिरात झालेल्या तपासणीनंतर डॉक्टरांचा अहवाल बदलापूर, ता.४ ः लॉकडाऊन शिथिल होऊन जीवनमान पुन्हा सुरळीत झाले असले तरी, लॉकडाऊनचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. बदलापूर शहरात नुकत्याच झालेल्या आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांना डोळ्यांच्या तक्रारीसोबत इतर आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. शिवसेना शाखा प्रमुख शाहबाझ खान यांनी सुप्रसिद्ध अश्या रायगड रुग्णालयाच्या माध्यमातून, बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील, म्हसकर - गुप्ते सभागृहात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी लहान मुलांची तपासणी, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी घेण्यात आली. लॉकडाऊनमध्ये सतत बैठ्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहेत. यात अनेकांना मधुमेह, हृदयासंदर्भात आजार, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. तसेच अगदी अबाल वृद्धांपासून सगळ्यांनाच दृष्टी कमी होणे, डोळ्यांच्या इतर तक्रारी जाणवू लागल्या आहेत. या बऱ्याच तक्रारी अगदी लॉकडाऊन मधील जीवनशैलीमुळे दिसून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षातील आरोग्य विषयक अहवालाचा विचार करता लॉकडाऊननंतर आरोग्याच्या अनेक तक्रारी दिसून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या शिबिरात शाहबाझ खान यांनी मोफत चष्मे वाटप यासोबतच, ज्येष्ठांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सोय सुद्धा करुन दिली. या शिबिराला रोहन पाटील, आदित्य पाटील इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT