मुंबई

तीन घटनेत पाच गाड्यांचे नुकसान

CD
तीन घटनेत पाच गाड्यांचे नुकसान सकाळ वृत्तसेवा, ठाणे : ता, ४ ः गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात घडलेल्या वेगवेगळ्या तीन आपत्तीजन्य घटनांमध्ये पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तीन चारचाकी गाड्यांचा समावेश असल्याचे दिसत आहे. एका घटनेत दोन गाड्यांना आग लागली आहे. तर इतर दोन घटनांमध्ये झाड आणि झाडाची फांदी पडून गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. साई सुदामा सोसायटीसमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर झाड उन्मळून पडल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यामध्ये त्या गाडीचे नुकसान झाले आहे. तर ठाणे रेल्वे स्टेशन जवळ झाडाची फांदी तेथे पार्क केलेल्या दोन दुचाकीवर पडल्याने त्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास माजिवडा, ओसवाल पार्कजवळ, राणे पार्किंग कंपाऊंडच्या आवारात अचानक आग लागली. त्याची झळ तेथील दोन टेम्पोला बसल्याने त्यामध्ये त्या टेम्पोचे नुकसान झाले आहे. या घटनांची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या तिन्ही घटनांध्ये कोणतीही जीवित हानी अथवा कोणालाही दुखापत झाली नसल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT