मुंबई

क्रूझमधील ६६ प्रवाशांना पालिकेने केले क्वारंटाईन

CD
क्रूझमधील ६६ प्रवासी पालिकडून क्वारंटाईन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : मुंबईहून गोव्याला गेलेल्या आणि पुन्हा मुंबईत संध्याकाळी सहा वाजता आलेल्या कार्डेलिया क्रूझमधील प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ६६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल उद्या (ता. ५) सकाळी आल्यावर निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांचे सात दिवस होम क्वारंटाईन केले जाणार आहे. पर्यटकांना घेऊन चार दिवसांपूर्वी कार्डेलिया क्रूझ गोव्याला गेली होती. गोव्यात गेल्यावर या क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली असता त्यामधील काही जण पॉझिटिव्ह आले. क्रूझमधील प्रवाशांना पाण्यातच क्वारंटाईन केले गेले होते. आज मंगळवारी सकाळी सहा वाजता कार्डेलिया क्रूझ मुंबईच्या ग्रीन गेटमध्ये आली. पालिकेने क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली असता त्यामधील ६६ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना पालिकेने १७ सीटर पाच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून भायखळा येथील रिचर्ड ॲण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये तसेच स्वखर्चाने हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT