मुंबई

खारघर मध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत होतेय वाढ

CD
खारघरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ बेजबाबदार नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी खारघर, ता. ४ (बातमीदार) : खारघरमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सहा दिवसांत शहरात ३४६ बाधितांची नोंद झाली आहे. त्‍यामुळे खारघरवासीयांनी कोरोना नियमाचे पालन करावे, मास्‍क वापरावा, सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेकडून करण्यात आले आहे. खारघर हा पनवेल पालिका क्षेत्रातील सर्वात मोठा नोड आहे. शहरातील आतापर्यंत २० हजार ५३५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १९ हजार ९३१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे २५८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत ३४६ रुग्‍ण उपचाराधीन आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी झाली होती. दर दिवशी चार ते पाच रुग्णांची नोंद होत होती. मात्र डिसेंबरअखेरीस रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खारघरमध्ये सहा दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून भाजीमार्केट, मासळीमार्केट, मॉल, बाजारपेठा, उद्यान तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणे गर्दी करण्यात येत आहे. अनेकांकडून मास्‍क वापरला जात नाही, वापरला तरी तो हनुवटीवर असतो. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्‍मक नियमांचे पालन करावे आणि लशींचे दोनही डोस घ्‍यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रुग्‍णसंख्येचा आलेख २९ डिसेंबर - २० ३० डिसेंबर - २८ ३१ डिसेंबर - ४६ १ जानेवारी - ५२ २ जानेवारी - ८९ ३ जानेवारी - १११ एकूण - ३४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT