मुंबई

नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावरून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न,

CD
वाशी खाडीपुलावरून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने वाचवले प्राण नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : चेंबूर भागात राहणाऱ्या एका तरुणीने मंगळवारी दुपारी वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तिला खाडीतून बाहेर काढल्याने ती बचावली. तरुणीच्या प्रियकराने तीन दिवसापूर्वी आत्महत्या केल्याने ती नैराश्यात होती. सध्या तिच्यावर महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरुणी चेंबूरमध्ये राहत असून याच भागात राहणाऱ्या एका तरुणावर तिचे प्रेम होते. प्रियकराने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र अल्पवयीन असल्याने तिने नकार दिला होता. तसेच १८ वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याबाबत सांगितले होते. प्रियकराने तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तरुणी नैराश्यात होती. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्यासाठी वाशी खाडी पूल गाठून तिने उडी टाकली. ही बाब काही नागरिकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी वाशी खाडी पुलावर धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमार महेश सुतार याच्या मदतीने तरुणीला बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. साहाय्यक पोलिस निरीक्षक यमगर यांनी तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT