मुंबई

नाल्यांच्या सफाईसाठी २५३ कोटी

CD
पालिकेची नालेसफाईची लगीनघाई २५३ कोटी रुपये खर्च करणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील नालेसफाईचा प्रश्‍न नेहमीच चर्चिला जातो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने या नालेसफाईवर प्रश्‍नचिन्हही उपस्थित केले जातात; परंतु कोरोनामुळे परिस्थितीत बदल झाल्याने प्रशासनाच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता, त्याचबरोबर कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे टाळेबंदीची धाकधूक, अशा कात्रित नालेसफाई अडकू नये म्हणून महापालिकेने आतापासूनच नालेसफाईची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार लहान नाले, पर्जन्यपेटिक, बॉक्स ड्रेन यासाठी १५१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे; तर मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई आतापर्यंत मार्च महिन्यानंतर सुरू करत होती. मात्र, कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाळेबंदी लागण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास नालेसफाईच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा अगोदर कामे सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसेच, महापालिकेची निवडणूकही होण्याची शक्यता आहे. या आचारसंहितेत प्रस्तावांची मंजुरी रखडू नये म्हणून पालिकेने नाले दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या निविदा उद्यापर्यंत....भरायच्या आहेत. तर, लहान नाल्यांच्या सफाईच्या निविदा १८ जानेवारीपर्यंत भरायच्या आहेत. मुंबईत २१५ किलोमीटरचे मुख्य नाले आहेत; तर १५६ किलोमीटर लांबीचे लहान नाले आहेत. तसेच एक हजार ९८६ किलोमीटर लांबीच्या पर्जन्यपेटिका आहेत. मागील वर्षी कोविडच्या टाळेबंदीमध्येही मुंबईतील १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. त्यावेळी तब्बल ३ लाख २४ हजार २८२ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही मुंबईतील अनेक भागांत दरवर्षीप्रमाणे पाणी साचले होते. काही वर्षांपूर्वी मुंबईत नालेसफाईचा घोटाळा उघड झाला होता. त्यामुळे दरवर्षीच नालेसफाईच्या कामावर प्रश्‍न निर्माण केले जातात. आता मार्चआधीपासूनच नालेसफाई सुरू होणार असल्याने पावसाळ्यातील परिस्थितीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. ...असा होणार खर्च शहर मोठे नाले - ११ कोटी ७६ लाख लहान नाले - ८ कोटी ३४ लाख पूर्व उपनगर - मोठे नाले - २६ कोटी ७५ लाख - लहान नाले - ३२ कोटी ४८ पश्‍चिम उपनगर - मोठे नाले - ४५ कोटी ३१ लाख - लहान नाले - ६१ कोटी ४४ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT