मुंबई

चेंबूर पश्चिम विभागात कोरोना रुग्णांत वाढ

CD
चेंबूर पश्चिम विभागात कोरोना रुग्णांत वाढ चेंबूर, ता. ५ (बातमीदार) ः मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. चेंबूर एम पश्चिम विभागात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सध्या चेंबूर एम पश्चिम, टिळकनगर, कुर्ला, चुनाभट्टी, नेहरूनगर, एल वार्ड, एम पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चेंबूर एम पश्चिम विभागात सोमवारी (ता. ३) रुग्णसंख्या एकूण २५० होती. मंगळवारी (ता. ४) ३५० होती. आज (ता. ५) ती ५५० झाली आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आजपासून वाशी नाका परिसरातील मेटल बॉक्स या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले असून सध्या रुग्णांना या कोविड सेंटरमध्ये भरती केले जात आहे. ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा. सॅनिटाईजर वापरावा. ताप, सर्दी खोकला आल्यास निष्काळजीपणा करू नये. ओमिक्रोनचा धोका होणार नाही, अशा भ्रमात राहू नये. दोन डोस घेणाऱ्यांनाही याची लागण होऊ शकते. व्याधी असणारे व वयोवृद्ध यांनी चाचणी करून लगेच उपचार करून घ्यावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळावे,’ असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.भूपेंद्र पाटील यांनी केले आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT