मुंबई

शहरातील गर्भवती महिलांना साह्य

CD
शहरातील गर्भवती महिलांना साह्य गुजराती सेवा समाजाचा उपक्रम मुंबई, ता. ५ ः मुंबई गुजराती सेवा समाजातर्फे शहरातील गर्भवती महिलांसाठी जीवनसत्त्वे, औषधे, स्त्री-रोगतज्ज्ञांचा व आहारतज्ज्ञांचा सल्ला, गर्भसंस्कार व योगाभ्यास प्रशिक्षण, अशा प्रकारे निःशुल्क साह्य करण्यात येणार आहे. आचार्य पवन त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून (ता. १०) हा कार्यक्रम सुरू होईल. यात गर्भवती महिलांना जीवनसत्त्वाच्या गोळ्या, प्रोटीन पावडर, अँटी स्ट्रेचमार्क क्रीम, तसेच अन्य अत्यावश्यक बाबी दिल्या जातील, अशी माहिती सेवा समाजाचे संस्थापक व मुंबई भाजप सचिव बिमल भुता यांनी दिली. गर्भवती महिलांना निर्मल गुजराथी व रश्मी फडणवीस या स्त्री-रोगतज्ज्ञांचा विनामूल्य सल्लाही मिळेल. तसेच आहारतज्ज्ञ अवनी मेहता यांच्यामार्फत वैयक्तिक डाएट प्लानही दिले जातील. तसेच प्राची गोराडिया यांची निःशुल्क गर्भसंस्कार प्रशिक्षण व्याख्याने, तसेच गर्भवती महिलांसाठी योगाभ्यास वर्गही घेतले जातील. ... येथे संपर्क करा कोविडमधून सावरलेल्या व्यक्तींचे विवाहसोहळे समाजातर्फे आयोजित करून त्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले जाते. समाजाने विलेपार्ले येथे ऑक्सिजन काँसन्ट्रेटर बँकही सुरू केली असून रुग्णालयांना व्हेंटीलेटरही दान केले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड रुग्णांना स्पायरोमीटरही दिले जातात. तसेच कोविडमुळे माता-पित्याचे छत्र गमावलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्यही केले जाते. अधिक माहितीसाठी संपर्क नीलेश गालिया ९३७२४८९९५९, तुषार कटरेचा ९८३३४८१२३८ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT