मुंबई

बहाडोलीच्या खाडी पुलाववरील रस्त्याची दुरुस्ती

CD
बहाडोलीच्या खाडी पुलाची दुरुस्ती रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतूक बंद मनोर, ता. ५ (बातमीदार) ः वैतरणा खाडीवरील बहाडोली येथील अरुंद पुलावरील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. अरुंद रस्त्यांमुळे एकेरी वाहतूक असलेल्या पुलावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडत होता. वाहन चालकांची गैरसोय निर्माण होत असल्याने पुलावरील रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली जात होती. अखेर वसई-विरार महापालिकेला दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारी रात्री पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. मनोर-पालघर रस्त्यावरील मनोर बाजारपेठेतील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून वसई- दहिसर- धुकटन रस्त्याचा वापर केला जात आहे. या रस्त्यावरील प्रवासामुळे अंतर आणि वेळेची बचत होत असल्याने मुंबई-ठाणे भागातून जिल्हा मुख्यालयाकडे जाणारे सनदी अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. बहाडोली येथील वैतरणा नदीच्या खाडी पुलावरील रस्ता अरुंद असल्याने एकेरी वाहतूक होते. त्यामुळे पुलावर वाहतूक नियमनासाठी वसई-विरार महापालिकेमार्फत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुलावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सुरुवातीला आणि पुलाच्या मध्यभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुलावर वाहनांचा वेग मंदावत आहे. त्यामुळे पुलावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडून वाहनचालकांची गैरसोय निर्माण होत आहे. पुलावरील रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने दुरुस्तीनंतर किमान चार तास वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री दहापासून पहाटे चारपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वसई विरार महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. - सौरभ वर्तक, कनिष्ठ अभियंता, वसई-विरार महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT