मुंबई

दुरुस्त रस्त्याला कचराकुंडी , वाहनांचा वापर , वसई विरार महापालिकेचा अजब कारभार

CD
दुरुस्त रस्त्याला कचराकुंडी, वाहनांचा वापर वसई-विरार महापालिकेचा अजब कारभार अभियंते गेले कुठे, करदात्यांचा पैसा वाया वसई, ता. ३ (बातमीदार) प्रसाद जोशी वसई-विरार शहर महापालिकेचा कारभार रामभरोसे सुरू आहे. अनेक ठिकाणी असुविधांचा डोंगर उभा राहत आहे. प्रदूषणावरून, अनधिकृत बांधकामावरून ताशेरे ओढले जात असताना आता सावर्जनिक बांधकाम विभागाचादेखील बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. रस्ते खराब झाल्याने वाहनचालकांना दिशादर्शक म्हणून चक्क कचरा कुंडी व कचरा वाहनांचा उपयोग केला जात असल्याने खरेदी केलेले साहित्य भंगारात जाण्याच्या मार्गावर आहे व करदात्यांच्या पैशांचा उपयोग पाण्यात जात आहे. वसई-विरार शहरात अनेक रस्ते नादुरुस्त आहेत. गटारे अखेरचा श्वास मोजत आहेत; तर अनेक भागांत मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक बेजार झाले आहेत. अशातच रस्त्यांची दुरुस्ती न करता रहदारीच्या ठिकाणी अपघात होऊ नये, वाहनांना जाण्याच्या मार्गावर चक्क कचराकुंडी व कचरा वाहन लावून नादुरुस्त रस्त्याला आवरण घालण्यात आले आहे. महापालिका कचराकुंड्या शहरातील कचरा नागरिकांनी एकत्रित जमा करावा म्हणून विकत घेते. स्वच्छता विभागासाठी निधीची तरतूद केली जाते, परंतु याचा वापर अशा कामांसाठी केला जात आहे. त्यातच हातगाडीदेखील लावली गेली असल्याचे वसईच्या पश्चिमेकडील रस्त्यावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गटाराचे चेंबर, रस्ते नादुरुस्त झाले; तर झाकण व रस्त्यांची डागडुजी न करता त्या ठिकाणी विविध वस्तू, दगड किंवा लाकूड लावण्यात येते, परंतु यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती असून याबाबत वसई-विरार शहर महापालिकेच्या सार्वजनिक विभागाने लक्ष दिले नाही, तर पर्यायी वापरासाठी वेगळीच शक्कल लढवल्याने नागरिकांतूनदेखील नाराजी व्यक्त केली जात आहे. ---- अशा प्रकारे जर कोणत्याही मार्गावर प्रकार घडला असेल तर कार्यवाही करण्यात येईल. कचरा कुंड्यांबाबत स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन मार्गावर येणाऱ्या अडचणी त्वरित दूर केल्या जातील. नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. प्रकाश साटम, अभियंता --- रस्ते, गटारांचे चेंबर खराब झाल्यावर सावधानतेचा इशारा देणारे फलकच पालिकेत नाहीत, हे दुर्दैव आहे. अशा वेळी झाडाच्या फांद्या, दगड लावून पालिका समाधान मानते व मार्ग अपघाती बनतात. नागरिकांच्या जीवाशी प्रशासनाने न खेळता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. किरण चेंदवणकर, माजी गटनेत्या, महापालिका. ----- वसई : पश्चिमेकडे अशाप्रकारे नादुरुस्त रस्त्याला कचराकुंडी व कचरा उचलणारे वाहन लावण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

land partition registration Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय, जमीन वाटणी फक्त १०० रुपयांत नोंदणी; सामान्य शेतकऱ्यांना दिलासा

Panchang 22 April 2026 : आजचे पंचांग! सूर्योदय, राहुकाल, शुभ मुहूर्त आणि राशीभविष्य

आजपासून विद्यार्थ्यांना तर २ मेपासून शिक्षकांना उन्हाळा सुट्टी! जनगणनेच्या प्रशिक्षणालाही आजपासून प्रारंभ, शिक्षकांना मिळणार विशेष रजा, वाचा...

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT