मुंबई

५० सीसीटिव्ही तपासले, २ सोनसाखळी चोर पकडले

CD
दोन सोनसाखळी चोरांना अटक सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ५ ः सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने या गुन्ह्यांची उकल करण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेज तपासात १० गुन्ह्यांची उकल केली. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, आरोपींचे कपडे, शूज याआधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मनोजकुमार ठाकूर व विकेश तिवारी, अशी अटक आरोपींची नावे असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली. सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे, अविनाश वनवे, पोलिस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, प्रवीण किनरे, दीपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, अनिल घुगे, दीपक जाधव, महेंद्र मंझा यांच्या पथकाने चोरीच्या घटना घडलेल्या भागात तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यादरम्यान काळ्या रंगाच्या शाईन बाईकवर वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करताना हे आरोपी आढळून आले होते. त्यांचा शोध घेत असताना दावडी गावात ही मोटरसायकल आढळून आली. त्याआधारे पोलिसांनी विकेश आणि मनोजकुमार यांना अटक केली. त्यांच्याकडून होंडा कंपनीची मोटरसायकल, दोन मोबाईल व सहा लाख ७५ हजार रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १० गुन्ह्यांची उकल सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मानपाडा पोलिस ठाण्यातील तीन, टिळकनगर पोलिस ठाण्यातील पाच तसेच डोंबिवली व विष्णूनगर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण १० गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT